दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नवव्यांदा समन्स पाठवले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ईडीने अरविंद केजरीवाल यांना नववे समन्स पाठवले आहे. तसेच त्यांना 21 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाने ईडीवर मुख्यमंत्र्यांना निवडणुकीपूर्वी अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
कथित दारू घोटाळा प्रकरणी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने आत्तापर्यंत आठ समन्स बजावले आहेत. मात्र, केजरीवाल यांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केले आहे. तर आता पुन्हा एकदा ईडीने त्यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे आता ईडीच्या नवव्या समन्सनंतरही अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.