तामिळनाडूमध्ये युतीच्या चर्चांना पूर्णविराम देत पट्टाली मक्कल काची (पीएमके) ने सोमवारी जाहीर केले की पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पीएमकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपसोबत युती केली आहे.
भाजपने तामिळनाडूमध्ये पट्टाली मक्कल काची (पीएमके) सोबत युती केली आहे. या आघाडीत पीएमकेला 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात या युतीचा मोठा फायदा भाजपला मिळू शकतो.
एनडीए आघाडीअंतर्गत पीएमके तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. पीएमकेचे अध्यक्ष डॉ. एस. रामदास अंबुमणी आणि तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी युतीची घोषणा केली.
रामदास अंबुमणी म्हणाले की, तामिळनाडूच्या जनतेला बदलाची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ते म्हणाले की, आमची आघाडी केवळ तामिळनाडूतच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठा विजय मिळवेल आणि पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.