भारतीय जनता पक्षाने (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे. या टप्प्यात भाजपने पुद्दुचेरी आणि तामिळनाडू राज्यातील त्यांच्या लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत पुद्दुचेरीतील ए. नमस्वयम यांना तिकीट देण्यात आले आहे. तर तिरुवल्लूर (SC) तामिळनाडूचे व्ही बालाघनपथी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार, चेन्नई उत्तरमधून आरसी पॉल कनागराज, तिरुवल्लूरमधून पोन व्ही बालगणपती, तिरुवन्नमलाईमधून ए अश्वथामन, नमक्कलमधून केपी रामलिंगम, त्रिपुरामधून एपी मुरुगानंदम, पोल्लाचीमधून के वसंतराजन, करूरमधून व्हीव्ही सेंथिलनाथन, चिदंबरम येथून श्रीपती पी कार्तियायनी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर तंजावुर येथून एम मुरुगानंदम, मदुराई येथून राम श्रीनीवासन, नागपत्तिनम येथून एस जी रमेश, शिवगंगा येथून देवनाथन यादव, विरुद्धनगर येथून राधिका शरतकुमार, टेनकासी येथून जॉन पांडियान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपने पुद्दुचेरीतील एकमेव लोकसभा जागेवर नमाशिवायम यांना उमेदवारी दिली आहे.
2024 च्या या सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिलपासून मतदान होणार आहे.
भाजपने चौथ्या यादीत तामिळनाडूतील 15 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने एक दिवस आधी तिसरी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये तामिळनाडूमधून 9 उमेदवारांना तिकीट दिले होते. या तिसऱ्या यादीत तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांना कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या यादीत दुसरे सर्वात मोठे नाव आहे ते तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांचे. भाजपने त्यांना दक्षिण चेन्नईतून तिकीट दिले आहे.