पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भुतांच्या दौऱ्यावर असताना नागरिकांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भारत आणि भूतान मधील तरुणांच्या आकांक्षा आणि उद्दिष्टे सारखीच आहेत. BB म्हणजे भूतान आणि भारत या दोन्ही देशांना यशस्वी करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ असे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताशिछो झोंग पॅलेसमध्ये केलेल्या भाषणात २०१४ मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून भूतानला दिलेल्या त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”भूतान आणि भारताचे संबंध जितके प्राचीन आहेत, तितकेच ते ते नवीन देखील आहेत. २०१४ मध्ये भारताचा पंतप्रधान झाल्यानंतर मी भूतानला भेट दिलेला पहिला देश होता. 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी येथे आलो होतो तेव्हा माझे स्वागत मला आठवते. भारत आणि भूतानच्या तरुणांमध्ये असणाऱ्या आकांक्षा आणि उद्दिष्टे एकसारखीच आहेत. भारताने २०४७ पर्यंत विकसित देश बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर भूतानने 2034 पर्यंत उच्च उत्पन्नाचा देश बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, BB म्हणजेच ब्रँड भूतान आणि भूतान दोन्ही बनवण्यासाठी भारत प्रत्येक पावलावर तुमच्या पाठीशी उभा आहे. ”
दरम्यान भूतान दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो’ हा भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार १४० कोटी देशवासियांना समर्पित केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या राजाकडून ‘ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तेव्हा मोदी म्हणाले, ”हा सन्मान माझा वैयक्तिक नसून, हा भारताचा आणि १४० कोटी देशवासीयांच्या सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान नम्रपणे स्वीकारतो. या सन्मानासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.