काल संध्याकाळी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला असून त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी,22 मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये गोळीबार आणि स्फोट घडवून आणला आहेदरम्यान मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे. दरम्यान मॉस्को मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया पोस्ट केली आहे.
मॉस्कोमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये मोदी म्हणाले, ”मॉस्कोमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दुःखाच्या प्रसंगी भारत रशियन सरकार आणि लोकांच्या पाठीशी उभा आहे.”
https://twitter.com/narendramodi/status/1771357097390719438
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की पाच हल्लेखोरांपैकी एक पकडला गेला आहे.रशियन आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार , पाच मुलांसह 115 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 60 जणांची प्रकृती गंभीर आहे.तसेच मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मॉस्को सिटी ड्यूमाचे अध्यक्ष ॲलेक्सी शापोश्निकोव्ह यांनी मॉस्को रहिवाशांना पीडितांवर उपचार करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. अग्निशामक दलाने एव्हाना सुमारे 100 लोकांना इमारतीतून बाहेर काढले,असून रशियन फेडरेशनच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाच्या मुख्य संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, बचावकर्ते अजूनही लोकांना छतावरून बाहेर काढण्याचे काम करत आहेत .
.