रंगीबेरंगी रंगांचा होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होताना बघायला मिळतो, मात्र या सणाच्या साजरा करण्याच्या पद्धतीतले ठिकठिकाणचे वैविध्य जास्त आकर्षक आहे. मथुरा, वृंदावन आणि द्वारका शहरांनंतर वाराणसीची होळी जगात सर्वाधिक चर्चेत असते, मोठ्या धुमधडाक्यात हा उत्सव वाराणसीमध्ये सर्व घाटांवर साजरा केला जातो. होळीचा हा उत्सव वाराणसीमध्ये अस्सी घाटावर बघायला मिळतो.
याही वर्षी हा रंगांचा सण, होळी साजरी करण्यासाठी वाराणसीतील प्रसिद्ध अस्सी घाटावर भाविक आणि भाविक मोठ्या संख्येने जमले होते. रंगीत पावडर आणि फुलांच्या पाकळ्या एकमेकांवर टाकताना लोक आज इथे होळीच्या गाण्यांवर नाचताना दिसले.
देशभरात उद्या म्हणजे २४ मार्चला होळी हा सण साजरा होत आहे. या दिवशी होळी पेटवली जाते , जी होलिका या राक्षसिणीच्या दहनाचे प्रतीक आहे.तसेच या उत्सवादरम्यान, पारंपारिक मिठाई बनवली जाते. ,लोकांमध्ये सौहार्द आणि एकजुटीची तसेच प्रेमाची भावना वाढवण्याचे काम हा सण करतो.
वृंदावन, मथुरा आणि बरसाना यांसारखी देशातील काही सर्वात जुनी आणि लोकप्रिय तीर्थक्षेत्रे या दिवशी पर्यटकांना आकर्षित करतात आणि होळीच्या रंगांत मनमुराद रंगून जातात.
हा उत्सव भगवान कृष्णालाही समर्पित आहे, ज्यांनी उत्तर प्रदेशातील ब्रज नावाच्या प्रदेशात बराच वेळ घालवला असे मानले जाते. त्यामुळे हा उत्सव फक्त होळी म्हणून नव्हे नव्हे तर राधा आणि कृष्णाच्या कालातीत प्रेमाची आठवण म्हणूनही साजरा केला जातो.
” ब्रज की होळी” ही देशातील सर्व होळी उत्सवांमध्ये विशेष मानली जाते.
ब्रज मध्ये साजरी होणारी होळीची परंपरा भगवान कृष्ण आणि राधा यांच्या जीवनातून संकेत घेत साजरी होते. मथुरा, वृंदावन, बरसाना, नांदगाव आणि गोकुळ येथील उत्सव कृष्ण कन्हैया यांना समर्पित आहेत, ज्यांनी या प्रदेशांमध्ये त्यांचे बालपण व्यतीत केले असे मानले जाते.
10 दिवसांच्या ब्रज की होळीमध्ये वृंदावनातील बांके बिहारी मंदिरातील फुलवाली होळी (20 मार्च रोजी), गोकुळमधील छडी मार होळी (21 मार्च), वृंदावन येथील राधा गोपीनाथ मंदिरातील विधवांची होळी (23 मार्च रोजी), फुलांची होळी इतक्या प्रकारांचा समावेश असतो. बांके बिहारी मंदिरात (२४ मार्चला), मथुरा आणि वृंदावनमध्ये होळी (२५ मार्चला), दौजी मंदिरात बलदेवमध्ये (२६ मार्चला) हुरंगा होळी.खेळली जाते.