देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) अलीपूर (Alipur) भागातील एका कारखान्यात आज (25 मार्च) सकाळी भीषण आग (Fire) लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही आग इतकी भीषण होती की त्याचे धुराचे लोट दूरवरून दिसत होते. तसेच आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी एकूण 34 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेलं नाही.
अग्निशमन विभागाला सकाळी 6:15 वाजता बुधपूर, अलीपूर दिल्ली येथे मोठी आग लागल्याची माहिती मिळाली. ज्या ठिकाणी आग लागली तेथे आरओ फॅक्टरी, व्हर्लपूल गोदाम आणि तेलाचे गोदाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आग खूप मोठी आहे, मात्र अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, यामध्ये लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य कोणताही अनुचित प्रकार टाळता यावा यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.