मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगेंची लढाई ही गोरगरिब मराठ्यांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायचं होतं, त्यासाठी जरांगेंची लढाई सुरू होती, असा खुलासा अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. त्यांनी आज (26 मार्च) पत्रकार परिषद घेऊन जरांगेवर हल्लाबोल केला.
यावेळी अजय महाराज बारसकर म्हणाले की, मनोज जरांगेंवर आधी विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला. पण आता काही अशा घटना घडल्या आहेत ज्याने त्यांनी विश्वासार्हता कमी झाली आहे. आरक्षणाचा लढा हा आता राजकीय लढा झाला आहे. परवाच्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते त्यांनी जरांगेंना शिव्या घातल्या आहेत. तसेच अशोक चव्हाण हे परवा रात्री मनोज जरांगेंना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. पण जरांगे तु्म्ही आधी म्हणाला होतात की सीएम, डीसीएम सोबत फेसटामईवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. मग आता अशोक चव्हाणांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली, त्याची रेकॉर्डिंग जगासमोर आणा.
पुढे बारसकरांनी जरांगेंच्या उपोषणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ज्यादिवशी जरांगेंनी वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी मटण खाल्लं होतं. ज्यावेळी जरांगे देवेंद्र फडणवीसांच्या घरी जायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलं होतं. तसंच ज्यांच्या हाताने तुम्ही उपोषण सोडलं त्या महिलेनं तिसऱ्या दिवशी नवी कोरी गाडी घेतली. कुठून आले एवढे पैसे? असा खोचक सवाल बारसकरांनी केला.
जरांगे आता तुम्ही फडणवीस साहेब फडणवीस साहेब असे म्हणायला लागले आहात. एसआयटी चौकशीला घाबरलात का? असंही बारसकर म्हणाले.