विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ज्योती मेटेंनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला आहे.
आज (26 मार्च) ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच महाविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्याविरूद्ध ज्योती मेटे असा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्राम पदाधिकऱ्यांची महत्त्वाची बैठकी घेतली. या बैठकीत निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. तर आता ज्योती मेटे या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा त्या अपक्ष लढणार याबाबत दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे.