राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस दलात बंपर भरती सुरु केली आहे. या भरतीअंतर्गत १७,४७१ विविध पदांवर भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी सूचना काढण्यात आली आहे. या भरतीसाठी इकचुक उमेदवारांनी mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकता. हा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. आता पोलीस भरतीसाठी तुम्हाला १५ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
५ मार्च २०२४ पासून अर्ज भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १५ एप्रिल आहे. तसेच एकूण १७ हजार ४७१ जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा पाडावावर भरती करण्यात येणार आहे.
अर्ज दाखल करणाऱ्यांचे वय हे १८ ते २८ दरम्यान असणे आवश्यक आहे. मागासवर्ग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ४५० रुपये शुल्क भरावे लागेल. यात मागासवर्ग उमेदवाराला १०० रुपयांची सवलत मिळेल. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी उमेदवाराने १२ वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.