लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Elections 2024) पूर्वी नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे सुरू आहे. काल (27 मार्च) रात्री अमरावतीच्या (Amaravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राष्ट्रीय स्वाभिमानी पार्टीचा राजीनामा दिला असून त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. अशातच आता नवीन जिंदाल यांच्या आई आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल (Savitri Jindal) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आता त्यांना भाजपने कुरूक्षेत्र हरियाणातून उमेदवारी दिली आहे. तर नवीन जिंदाल यांच्यानंतर आता त्यांची आई सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
याबाबतची माहिती सावित्री जिंदाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, “मी आमदार म्हणून हिसारच्या लोकांचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच मंत्री म्हणून हरियाणा राज्याची नि:स्वार्थपणे सेवा केला आहे. हिसारचे लोक हे माझे कुटुंब आहेत आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला पाठिंबा आणि आदर दिला आहे.”
सावित्री जिंदाल या हिसार मतदारसंघातून आणि दहा वर्षांपासून हरियाणा सरकारमध्ये मंत्री आहेत. जिंदाल यांचे पती ओपी जिंदाल यांचे 2005 मध्ये अपघातात निधन झाले होते. त्यानंतर सावित्री जिंदाल या हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर निवडणूक आल्या होत्या. तसेच 2009 मध्ये सावित्री जिंदाल यांनी पुन्हा निवडणूक जिंकली होती. तर 2013 मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.
विशेष सांगायचं झालं तर, सावित्री जिंदाल यांचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत आघाडीवर आहे. त्या जिंदला ग्रुपचा मोठा व्यवसाय सांभाळतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, सावित्री जिंदाय या जगातील अब्जाधीशांच्या यादीत 56 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 29.6 अब्ज डॉलर आहे, जी भारतीय चलनात सुमारे 2.47 लाख कोटी रूपये एवढी आहे.