देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदनांत दाते यांची केंद्र सरकारने एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सदानंद दाते आणि अन्य दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये नियुक्त्या केल्या आहेत.
सदानंद दाते हे १९९० च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी दाखवलेले शौर्य आणि बुद्धीमत्तेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. सदानंद दाते यांनी आयपीएस म्हणून अनेक पदांवर कार्य केलेले आहे. सदानंद दाते हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये डीआयजी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये आयजी म्हणून देखील काम केले आहे. सदानंद दाते हे ३० वर्षांपासून पोलिस सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास झाल्यानंतर आयपीएस होण्याचे ठरवले.