संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज (28 मार्च) सांगितले की, त्यांचे सरकार अग्निवीर भरती योजनेत (Agniveer Scheme) आवश्यक असल्यास बदल करण्यास तयार आहे. टाईम्स नाऊ समिटमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकारने अग्निवीरांचे भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.
संरक्षण दलात तरुण असणे आवश्यक आहे, असे सांगून राजनाथ सिंह यांनी या योजनेचा बचाव केला आणि ते म्हणाले, “लष्करात तरुण असले पाहिजेत. मला वाटते की तरुण अधिक उत्साही आहेत. ते अधिक तंत्रज्ञान जाणणारे आहेत. आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेतली आहे. त्यांचे भविष्य देखील सुरक्षित आहे हे लक्षात ठेवा. गरज पडल्यास आम्ही बदल देखील करू.”
अग्निवीर नावाचे रिक्रूट चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवा देतात ज्यामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर 3.5 वर्षांच्या तैनातीचा समावेश होतो. सेवेतून निवृत्तीनंतर, त्यांना सशस्त्र दलात सुरू राहण्यासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.
घोषित केल्याप्रमाणे, ‘अग्निपथ’ किंवा ‘अग्नीवीर’ योजना ही लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांची भरती करण्याची प्रक्रिया आहे, ज्यांना चार वर्षांच्या करारावर नियुक्त केले जाते.