राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसून येत आहेत. कधी कडक उन्हाळा तर, कधी पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. एप्रिल आणि मे महिना सुरु होण्याआधीच वातावरणात गरमा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. राज्यातील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई , कोकण आणि काही भाग सोडून राज्यात बाकी ठिकाणी पारा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सरासरी तापमानापेक्षा पारा जास्त राहील अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील एक ते दोन दिवसांमध्ये मुंबईसह कोकण भाग सोडून इतर ठिकाणी ढगाळ हवामान राहू शकते असे मत व्यक्त करण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच जळगाव, धुळे, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह अनेक ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेला दिसून येत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक अनेक उपाय करताना दिसून येत आहे.