सध्या आसाममध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाने आसाममधील पावसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे गोपीनाथ बोर्डाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा काही भाग अचानक कोसळला.
विमानतळाच्या छताचा काही भाग अचानक कोसळल्यामुळे सहा विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. तर या विमानतळाच्या देखभालीची जबाबदारी अदानी ग्रुपकडे आहे.
सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विमानतळाच्या छताचा एक भाग कोसळताना दिसत आहे. तर या घटनेनंतर कर्मचारी आणि प्रवासी बचावासाठी धावताना दिसत आहेत.
याबाबत विमानतळ कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विमानतळाचा कोसळलेला भाग खूप जुना झाला होता, त्यामुळे जोरदार पाऊस आणि हवा तो सहन करू शकला नाही. जोरदार पावसामुळे तो भाग कोसळून टर्मिनलमध्ये पाणी वाहू लागलं. पण सुदैवाने यात कोणतीही दुखापत झालेली नसून सर्व काही नियंत्रणात आहे.