काल (31 मार्च) दिल्ली कॅपिटल्स (DC) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) असा रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी सीएसके संघाचा पराभव केला. आयपीएलच्या या हंगामातील सीएसकेचा पहिला पराभव आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला पहिला विजय मिळाला आहे.
कालच्या सामन्यात दिल्लीने सीएसके समोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याला प्रत्युत्तरात सीएसकेला 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. एकिकडे सीएसके संघाचा पराभव झाला असला तरी कालच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी दमदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने दमदार अशी खेळी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
एकिकडे सीएसकेचा पराभव झाला असताना दुसरीकडे धोनीचं 10 वर्ष जुनं ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये धोनीने लिहिलं आहे की, “कोणाचा संघ जिंकला याने काही फरक पडत नाही, मी येथे मनोरंजन करायला आलो आहे.” धोनीने हे ट्विट टी-20 वर्ल्ड कपमधील भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर 24 मार्च 2014 रोजी केलं होतं.
https://twitter.com/msdhoni/status/447825958012473344
सध्या धोनीचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण कालच्या सामन्यात धोनीने तुफान खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. त्याने अवघ्या 16 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. या काळात धोनीचा स्ट्राइक रेट 231.25 होता.