इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ४ एप्रिल रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना हजर करण्याचे आदेश दिले होते. पाकिस्तानस्थित ARY न्यूजने ही माहिती दिली आहे. दरम्यान पाकिस्तानी न्यायालयाने तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यां तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणातील शिक्षेचे अपील मंजूर झाल्याने १४ वर्षांची शिक्षेला स्थागिती देण्यात आली आहे.
८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीआधी एक आठवडा अगोदर इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी बेकायदेशीरपणे भेटवस्तू विकल्याचे आरोपाखाली १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेच प्रकरण पाकिस्तानमध्ये तोशखाना म्हणून प्रसिद्ध आहे. निवडणुकीपूर्वी अनेक शिक्षा झाल्याने इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. तसेच १० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद भूषविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोन क्रूरतेच्या खटल्यांतून निर्दोष मुक्तता केली, असे एआरवाय न्यूजने वृत्त दिले आहे. इस्लामाबादमध्ये पक्षाच्या लाँग मार्चदरम्यान इम्रान खानविरुद्ध लुही भीर आणि सहाला पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायदंडाधिकारी आयशा कुंडी यांनी दोन्ही प्रकरणांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली. इम्रान खान यांच्यावर तोशखाना (स्टेट स्टोअर) प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.