दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली (Patanjali) आयुर्वेदाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर आज (2 एप्रिल) सुनावणी झाली. वैयक्तिक हजर राहण्यासाठी जारी केलेल्या समन्स अंतर्गत रामदेव बाबा (Ramdev Baba) सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
आज रामदेवबाबा आणि बाळकृष्ण हे दोघेही कोर्टात पोहोचले होते. सुनावणीदरम्यान रामदेव बाबांच्या वकिलांनी म्हटलं की, दिशाभूल करणाऱ्या जाहीरांतासाठी आम्ही माफी मागतो. आपण दिलेल्या आदेशानुसार स्वत: रामदेव बाबा कोर्टात पोहोचले आहेत.
रामदेव बाबा स्वत: कोर्टात हजर असून ते माफी मागत आहेत. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. तसंच कोर्टापासून आम्ही पळ काढण्याचा प्रयत्न करत नाही, असेही पतंजलीच्या वकिलांनी म्हटलं आहे.