दिल्लीतीळ दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना १९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र याच प्रकरणात अटक करण्यात आले आपचे खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर झाला आहे. मागच्या वर्षी खासदार संजय सिंह यांना ईडीने दारू घोटाळ्यामध्ये आरोपी म्हणून अटक केली होती. मात्र आता त्यांना ६ महिन्यानंतर जमीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना जमीन मंजूर केला आहे.
आप खासदार संजय सिंह यांना जमीन देताना जमिनीच्या अटीशर्ती या ट्रायल कोर्ट निश्चित करेल. हा जामीन उदाहरण म्हणून मानला जाणार नाही. ईडीनेही जामीनाला विरोध केला नाही आणि त्यांना जामीन दिला जाऊ शकतो असे सांगितले. आता संजय सिंह यांना राजकीय कामे करता येणार आहेत. दरम्यान संजय सिंह यांनी हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने ती फेटाळून लावली होती. ईडीने संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात अटकेत आहेत. संजय सिंग, मनीष सिसोदिया आणि के. या प्रकरणी कविता आधीच तुरुंगात आहेत. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि १० दिवस ते ईडीच्या कोठडीत होते. सध्या त्यानं न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.