लोकसभा निवडणूका (Loksabha Elections) तोंडावर आल्या असतानाच अनेक नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. यामध्ये आता भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
खासदार उन्मेष पाटील हे उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असल्याची माहिती आहे.
जळगावमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळे आता ते सपत्नीक ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, उन्मेष पाटील यांचं काम चांगलं आहे. ते आज आम्हाला भेटले, त्यानंतर आम्ही मातोश्रीवर गेलो आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. तर आता उन्मेष पाटील पक्षात येण्याबाबत उद्यापर्यंत कळेल.