पुण्यातील ससून रुग्णालय सतत चर्चेत राहणारे रुग्णालय आहे. आता पुन्हा एकदा ससून रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयात आयसीयूत उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू (Death) झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात नेमके काय सुरु आहे असा सवाल आता पुण्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.
आयसीयूत दाखल असलेल्या रुग्णाचा अपघात झाल्यामुळे तो ससूनमध्ये उपचार घेत होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याची प्रकृती खालावली होती. मात्र असे कशामुळे झाले याचा शोध घेतला असता त्याचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे त्याची प्रकृती खालावली असल्याचे समोर आले. उंदराने शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला आहे. उंदीर चावून या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी देखील मान्य केले आहे.