Taiwan Earthquake तैवानला आज शक्तीशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे राजधानी तैपेईसह इतर भागात घबराट पसरली. तैवानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी मोजली गेली. संपूर्ण बेट या भूकंपाच्या धक्क्याने हादरले अनेक इमारती कोसळल्या.यात आतापर्यंत ५० जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तैवानच्या भूकंपामुळे जपानलाही धोका निर्माण झाला आहे. जपानच्या दक्षिणेकडील ओकिनावासाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. इथून उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. फिलीपीन्सला सुद्धा त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे तसेच किनारपट्टीचा भाग रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जपानाच्या हवामान विभाग एजन्सीने भूकंपानंतर 3 मीटर (9.8 फिट) उंचीच्या त्सुनामीच्या लाटा उसळतील अशी शक्यता वर्तवली आहे.
तैवान हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्र 15.5 किलोमीटर खोलीवर हुआलियन काउंटी हॉलपासून 25 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता.मागच्या 25 वर्षातील तैवानमधील हा शक्तीशाली भूकंप आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून . स्पीड ट्रेनची सर्विस थांबवण्यात आली आहे .तसेच अंडरग्राउंड रेलवे स्टेशन्समधून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
याशिवाय ताइतुंग काउंटी, चियाई काउंटी, युनलिन काउंटी, काओशिंग, चियाई, सिंचू, ताइनान आणि कीलुंग, पिंगटुंग काउंटी, पेंगू काउंटी, लिआनचियांग काउंटी, किनमेन काउंटी येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तैवान हवामान संस्थेने तैवान क्षेत्रासाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांना जोरदार पुरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा इशारा देण्यात आला आहे.