आयपीएल 2024 (IPL 2024) चा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला. हा सामना विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात केकेआरच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 7 गडी गमावून 272 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 17.2 षटकांत 166 धावांवर सर्वबाद झाला. तर केकेआर संघाने या मोसमात आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली असून सलग तिसरा सामना जिंकला आहे.
धावांच्या बाबतीत हा मोसमातील सर्वात मोठा विजय आणि पराभव आहे. या विजयासह, KKR ने हंगामातील सलग तिसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के केले आहे. दिल्लीसाठी कर्णधार ऋषभ पंतने 25 चेंडूत सर्वाधिक 55 धावा केल्या.
डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने षटकार आणि चौकार मारले. ओपनिंग करताना सुनील नरेनने 39 चेंडूत 85 धावा करत आपल्या T-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या केली. आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करताना 18 वर्षीय अंगक्रिश रघुवंशीनेही अर्धशतक ठोकले. गोलंदाजीत वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर सुनील नरेनने सात चौकार ठोकले. आपला आक्रमक फॉर्म कायम ठेवत नरेनने दिल्लीच्या सर्व गोलंदाजांना गारद केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात फलंदाजीची संधी न मिळाल्यानंतर रघुवंशीने 27 चेंडूत 54 धावा केल्या. नरेनसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली. 18 वर्षाच्या आंगक्रिशने मैदानात येऊन पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. दुसरा चेंडूही त्याने सीमारेषेवर नेला. दिल्लीच्या गोलंदाजांना या दोन फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही. आंद्रे रसेलने 19 चेंडूत 41 तर रिंकू सिंगने आठ चेंडूत 26 धावा केल्या. संघाच्या इतिहासात दिल्लीच्या गोलंदाजांनी एका सामन्यात सर्वाधिक धावा गमावल्या.
एका जीवघेण्या अपघातानंतर 15 महिने बाहेर बसलेल्या ऋषभ पंतने आयपीएल 2024 मधून पुनरागमन केले आणि केकेआरविरुद्धच्या सामन्यातही आपला फॉर्म दाखवला. ऋषभ पंतने मैदानावर चौफेर फटके मारले. त्याने 25 चेंडूत 55 धावांची स्फोटक खेळी खेळली नसती आणि ट्रिस्टन स्टब्स (32 चेंडूत 54 धावा) सोबत भागीदारी केली नसती तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवापासून दिल्लीला कोणीही वाचवू शकले नसते.