महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये. जात पडताळणी प्रकरणी अपात्र ठरलेल्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्दच ठेवण्यात आली आहे. तसंच उच्च न्यायालयाने रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
आज (4 एप्रिल) रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे, पण बर्वेंचा उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने या निकालाला स्थगिती दिली आहे.
खोटे कागदपत्र लावल्यामुळे रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरविले होते. तर प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणूकीचा उमेदावरी अर्ज रद्द करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज निकाल अपेक्षित होता पण जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.