आता पुढील काही महिने हे लग्नसराईचे व सणासुदीचे आहेत. गुढीपाडवा, अक्षयतृतीया गणपती, नवरात्र , दिवाळी असे अनेक सण आपण साजरे करणार आहोत. आनंदाच्या व सणासुदीच्या काळात सोने खरेदीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वाढतात ही गोष्ट नवीन नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर झपाट्याने वाढत आहे. MCX वर सोन्याचे दर ७० हजारांच्या वर गेले आहेत. तसेच प्रति तोळा सोन्याचा दर हा ६९,८०५ रुपयांवर गेला आहे. तर चांदीचा दर हा ८० हजारांच्या आसपास गेला आहे.
सोन्याच्या वाढत्या दरामुळे सोने खरेदी करणे थोडे अवघड होताना दिसून येत आहे. केंद्रीय बँकांच्या गोल्ड लॉकर्समध्ये अनेक टन सोन्याची वाढ झाली आहे. बँक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करताना दिसून येत आहे. दरम्यान, यूएस फेडरल रिझर्व्हच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
बाजार सुरु झाल्यावर सोन्याने उच्चांकी पातळी गाठली. काल सोन्याचा दर प्रतितोळा ६९ हजारांच्या वर जाऊन स्थिर झाला. जळगावमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर जीएसटीसह 68700 रुपये इतका नोंदवण्यात आला. तर पुण्यात सोन्याच्या दराने प्रतितोळा ७०८४३ रुपयांचा स्तर गाठला.म्हणजेच अवघ्या चार ते पाच दिवसांत सोन्याचे दरात ४ ते ५ हजारांची वाढ झाली आहे. गुढीपाडवा हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त समजला जातो. ९ तारखेला गुढीपाडवा आहे. त्यामुळे सोन्याचा दर अजून वाढण्याची शक्यता आहे. ७० हजारांच्या आसपास असणारे सोन्याचा दर प्रतितोळा ७५ हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.