भारत सध्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. भारत सध्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. तसेच स्वदेशी हत्यारे निर्मितीमध्ये देखील भारत मोठ्या प्रमाणात विकास करताना दिसून येत आहे. भारताच्या संरक्षण दलांमध्ये स्वदेशी हत्यारांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी तसेच शक्य तितकी हत्यारे देशातच तयार करावीत असा विचार या स्वदेशी योजनेमागचा आहे. भारताने या क्षेत्रात आणखी एक यशस्वी कामगिरी केली आहे. एसएफसी आणि डीआरडीओ यांनी मिळून न्यूक्लिअर बॅलेस्टिक मिसाईल अग्नी प्राईमची यशस्वी चाचणी केली आहे.
डीआरडीओ आणि एसएफसीने अग्नी मिसाईलची यशस्वी चाचणी ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून केली आहे. चाचणी दरम्यान, नवीन पिढीच्या क्षेपणास्त्राने विश्वासार्ह कामगिरी राखून सर्व चाचणी उद्दिष्टे पूर्ण केली. टर्मिनल पॉईंटवर दोन डाउनरेंज जहाजांसह विविध ठिकाणी तैनात केलेल्या एकाधिक श्रेणी सेन्सरद्वारे कॅप्चर केलेल्या डेटाद्वारे या चाचणीची पुष्टी केली गेली आहे. हे यशस्वी प्रक्षेपणपाहण्यासाठी भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी ,चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि डीआरडीओचे प्रमुख उपस्थित होते.
भारत देश दिवसेंदिवस संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगत करत आहे. संरक्षण निर्यात क्षेत्रात भारताने २१ हजार कोटींचा टप्पा नुकताच पार केला आहे. त्यामुळे हवाई दल, नौदल आणि लष्कर हे अधिक सामर्थ्यवान बनत आहे. नवनवीन पाणबुड्या असतील, फायटर प्लेन्स, युद्धनौका, बंदुका, रणगाडे असतील सर्वच हत्यारांची निर्मिती भारत स्वतः तयार करताना दिसून येत आहे.