अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका (Loksabha Election) येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नागपूर (Nagpur) आणि रामटेक (Ramtek) लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी हजेरी लावणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपूर आणि रामटेकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. रामटेक येथे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी दिग्गज नेते मंडळींच्या सभा पार पडणार आहेत.
पूर्व विदर्भातील 5 लोकसभेच्या जागांसाठी आजपासून नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. एकिकडे आज रामटेक आणि नागपूरमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे आज संध्याकाळी नागपूर लोकसभा मतदारसंघात दक्षिण-पश्चिम विधानसबा परिक्षेत्रात भाजपचे उमेदवार यांची नितीन गडकरी यांच्यासोबत प्रचार यात्रा निघणार आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकरता प्रचार सभा होणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उद्या नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा होणार आहे.