IPL 2024 च्या 20 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे (MI vs DC). दोन्ही संघांमधील हा सामना वानखेडे मैदानावर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्ससमोर 234 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या. इशान किशनने 42 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने 39 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये टीम डेव्हिडने 21 चेंडूत 45 धावा केल्या. तर रोमारियो शेफर्डने अवघ्या 10 चेंडूत 39 धावा केल्या.
मुंबईला अजूनही या मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल 2024 मध्ये संघाच्या गोलंदाजांनी खूप धावा दिल्या आहेत. बुमराह वगळता संघाचे बाकीचे गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. त्याचबरोबर फलंदाजीतही संघाची अवस्था बिकट आहे.
दुसरीकडे दिल्लीची गोष्टही मुंबईपेक्षा फारशी वेगळी नाही. चार सामन्यांपैकी दिल्लीला तीन पराभवही पत्करावे लागले आहेत. गेल्या सामन्यात KKR संघाचा 106 धावांनी पराभव केला होता. कोलकात्याविरुद्ध गोलंदाजांनी 20 षटकांत 272 धावा दिल्या होत्या. केवळ कर्णधार ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नर फलंदाजीत चांगल्या फॉर्ममध्ये दिसले आहेत.