सध्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे चांगलेच चर्चेत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. काल (7 एप्रिल) एकनाथ खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर आता खडसेंच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीज महाजन (Girish Mahajan) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे हे भाजपचे पहिल्या फळीचे नेते आहेत. पण त्यांनी भाजप पक्ष सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजूनही ते या दोन्ही नेत्यांवर टीका करताना दिसतात. तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी बऱ्याचदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचं दिसलं आहे. अशातच आता खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या पक्ष प्रवेशावर फडणवीस, खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये कोणीही प्रवेश करत असेत तर त्याला विरोध नाही. पण पक्षाने याबाबत आम्हाला अजून कळवले नाही. जर पक्षाने आम्हाला कळवले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.
दुसरीकडे खडसेंचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय विरोधक गिरीश महाजन म्हणाले की, खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश कधी होणार हे त्यांनाच माहिती. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आणि अमित शाह यांच्याशी आहे. त्यामुळे एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की आमची भूमिका तिच राहणार आहे. आता त्यांनी सांगितलं आहे की 15 दिवसांनी प्रवेश होणार आहे, त्यामुळे वाट बघू. एकनाथजी खूप मोठे नेते आहेत, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे ते काम नाही.