आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र त्यांच्यामागील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबद्दल युनिव्हर्सिटीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर भाष्य केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना दिलासा मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाहीये.
गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाच्या खटल्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे खासदार संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय सिंह यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरु आहे. समन्स रद्द न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संजय सिंह यांना ट्रायल कोर्टात जाण्यास सांगितले आहे. गुजरात हायकोर्टानेही कनिष्ठ न्यायालयाचे समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली होती.
दरम्यान आप खासदार संजय सिंह यांना दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मात्र त्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला हे. त्या प्रकरणात दिलासा मिळाला असला तरीही, मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.