देशासह राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल पाहायला मिळत आहेत. मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळा जाणवू लागला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील उन्हाच्या कडक झळा जाणवू लागल्या आहेत. एक दोन दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्या अंदाजानुसार देशासह राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे.
देशातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. देशभरात रविवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ , मध्य महाराष्ट्र या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. तर संकट अजूनही कायम आहे. मुंबई, पुणे आणि अन्य ठिकाणी उष्णतेची लाट बघायला मिळत आहे.
राज्यात पुढील ४८ तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ,मराठवाडा या भागात आयएमडीकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.