जयपूर (Jaipur) येथे बुधवारी झालेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) च्या 24 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरात टायटन्सचा ((Gujarat Titans) 3 गडी राखून पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा चालू मोसमातील हा पहिला पराभव आहे, तर गुजरातचा तिसरा विजय आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 196 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी 32 आणि दुसऱ्या विकेटसाठी 10 धावांची भागीदारी झाली. यानंतर संजू आणि रायन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी झाली.
रियान परागने वेगवान खेळी करत 48 चेंडूत 76 धावांची खेळी केली. कर्णधार संजू सॅमसनने 38 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने 5 चेंडूत 13 धावा केल्या. राशिद खान, उमेश यादव आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकात 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. साई सुदर्शनने 35 धावा केल्या. शुभमन गिलने 44 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 72 धावांची खेळी केली. राहुल तेवतियाने 22 धावा केल्या. तर राशिद खानने 24 धावांची नाबाद खेळी खेळली आणि शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून संघाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला.