टेस्ला आणि एक्स चे सीईओ एलॉन मस्क हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. एलॉन मस्क हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. जगातील श्रीमान व्यक्तींपैकी एक असणारे मस्क भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. याची माहिती खुद्द मस्क यांनी दिली आहे. एक्स वर पोस्ट करत मस्क यांनी ही माहिती दिली आहे. काल रात्री १० एप्रिल रोजी मस्क यांनी X वर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांच्या भारत भेटीची माहिती दिली. पोस्टमध्ये टेस्लाच्या सीईओने सांगितले की, ते भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत.
मागील वर्षी मस्क यांनी पंतप्रधान मोदी यांची दोन वेळा भेट घेतली होती. पण, मस्क भारतातच पंतप्रधान मोदींना भेटण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.मस्क हे लवकरच टेस्ला भारतीय बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. टेस्ला भारतीय बाजारात आणण्याची तयारी या आधीपासूनच सुरु करण्यात आली आहे. टेस्ला ही जगातील इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. पण, टेस्लाने भारतीय बाजारात अद्याप कोणतेही मॉडेल लाँच केलेले नाही. दरम्यान मस्क हे मोदींची भेट घेणार असल्याने त्यांच्या भेटीत कोणते निर्णय होतात हे आपल्याला लवकरच कळणार आहे.