बहुजन समाज पक्षाने (BSP) आज (12 एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना आझमगडमधून आणि माजी खासदार बाळकृष्ण चौहान यांना घोसीमधून उमेदवारी दिली आहे.
याशिवाय एटामधून मोहम्मद इरफान, धौराहारामधून श्याम किशोर अवस्थी, फैजाबादमधून सच्चिदानंद पांडे, बस्तीमधून दयाशंकर मिश्रा यांना संधी देण्यात आली आहे. तर गोरखपूरमधून जावेद सिमनानी, चंदौलीमधून सत्येंद्र कुमार मौर्य आणि रॉबर्टसगंजमधून धनेश्वर गौतम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
11 एप्रिल रोजी ईदच्या निमित्ताने, बसपा प्रमुख मायावती यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिली निवडणूक रॅली नागपूर, महाराष्ट्रातील इंदोरा भागातील बेजोनबाग मैदानावर घेतली. तर आज त्यांची उत्तराखंडमधील हरिद्वारमझ्ये जाहीर सभा आहे. तसेच मायावती 14 एप्रिलपासून उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक रॅली घेणार आहेत.