भारतीय रेल्वे ही देशातील दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने देशभरात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. दरम्यान रेल्वेचे बुकिंग करणे, तिकीट रद्द करणे, रेल्वे कुठे आले हे ट्रॅक करणे यासाठी रेल्वेचे IRCTC Rail Connect हे एक अँप लोकप्रिय आहे. १० कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी दे आपल्या संर्टफोनमध्ये डाउनलोड केले आहे. मात्र इतर काही सुविधांसाठी रेल्वेची वेगळी ऍप्स आहेत. मात्र नागरिकांची ही समस्या देखील लवकरच संपणार आहे. कारण भारतीय रेल्वे लवकरच एक सुपर अँप लॉन्च करणार आहे.
प्रत्येक समस्येसाठी असणाऱ्या अँपची कटकट संपणार आहे. रेल्वे लवकरच सुपर अँप लॉन्च करणार असून, रेल्वेच्या सर्व सुविधा प्रवाशाना या एकाच अँप मध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे, रद्द करता येणार आहे. तिकीट रद्द केल्यास २४ तासांमध्ये रिफंड देखील मिळणार आहे. रेल्वे ट्रॅक करणर असेल आणि इतर ज्या सुविधा आहेत, त्या सर्व या एकाच अँप मध्ये मिळणार आहेत.