उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) सोमवारी बिहारमध्ये (Bihar) पोहोचले. यादरम्यान रतनुआन मैदानावर मुख्यमंत्री योगींनी निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लालू यादव यांच्यावर हल्लाबोल केला.
रॅलीदरम्यान सीएम योगींनी बिहारचे दिग्गज डॉ. अनुग्रह नारायण सिंह यांची आठवण काढली. सीएम योगी म्हणाले की, 500 वर्षांनंतर भगवान राम अयोध्येत विराजमान झाले तेव्हा बिहारमध्ये उत्साह दिसत होता. तसेच नव्या भारताचा नजारा पाहायचा असेल तर औरंगाबादच्या लोकांनी काशी (वाराणसी)चे दृश्य पहावे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
पुढे लालू यादव यांचा खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, तुम्ही संख्या वाढवा, आम्ही त्यांना आवाज देऊ. देशाला सुरक्षा देण्याची मोदींची हमी आहे. बिहारमध्ये लालू यादव हे त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आहेत. बिहारमध्ये त्यांच्या कुटुंबासाठी जागांची कमतरता होती. काँग्रेस आणि राजदने देशात समस्या निर्माण केल्या आणि त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला.
यूपीमध्ये लालूप्रसादांसारखे कौटुंबिक राजकारण करणारे लोक आहेत, ज्यांना मी थंड केले आहे. आधी ते रामावर विश्वास ठेवत नव्हते आणि जेव्हा मी अयोध्येत मंदिर बांधले तेव्हा ते म्हणू लागले की राम सर्वांचा आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.