लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या प्रचाराला जोर आला आहे. पंतप्रधान मोदी देखील देशभरात प्रचार सभांचा धडाका लावत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ तारखेला होणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी बिहारमधील पूर्णिया येथे प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. सरकारच्या तिसऱ्या टर्मबाबत खूपच उत्साह दिसून येत आहे. हा उत्साह सांगत आहे की, अब की बार ४०० पार. विकसित भारतासाठी ४ जूनला ४०० पार, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, एक वेळ अशी होती जेव्हा केंद्र सरकारे बिहारला मागास म्हणून त्यांच्यापासून दूर जायची. बिहारची सरकारेही सीमांचलला मागास म्हणवून मुसंडी मारत होती, पण आम्ही सीमांचल आणि पूर्णियाचा विकास हेच आमचे ध्येय बनवले आहे. पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले, ”पूर्वी शेजारील देश आपल्या देशावर हल्ला करायचे. आमचे वीर जवान सीमेवर शहीद होयचे. शत्रूला घरात घुसून मारावे असे जनतेला वाटायचे. मोदींनी तुमची इच्छा पूर्ण केली.
त्याचा परिणाम असा झाला की. जो देश आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे ते आता भीक मागत फिरत आहेत. व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांनी पूर्णिया आणि सीमांचलला अवैध घुसखोरीचे ठिकाण बनवून त्यांची सुरक्षा धोक्यात आणली आहे. आमचे दलित, वंचित, मागासलेले, गोरगरीब याचे बळी ठरले आहेत. दलित बांधवांची घरेही जाळली. पण देशाच्या सुरक्षेशी खेळणारा प्रत्येक घटक सरकारच्या नजरेत आहे, असे त्यांना पूर्णियातील जनतेला आश्वस्त करायचे आहे. जे राजकीय फायद्यासाठी सीएएला विरोध करत आहेत त्यांना एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की हा मोदी आहे, ते घाबरत नाहीत आणि झुकत नाहीत.