आज (17 एप्रिल) गुगलच्या सीईओ कार्यलयात (Google’s CEO Office) अचानक पोलीस घुसले आणि गुगलच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे कर्मचारी न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियातील कंपनीच्या कार्यालयात निदर्शने करत होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. कंपनी इस्रायल सरकारच्या सहकार्याने काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यानंतर 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती आंदोलकांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
सध्या इस्रायल आणि गाझा यांच्यात युद्ध सुरू आहे. अशा स्थितीत गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की, अमेरिकन टेक कंपन्या इस्रायल सरकारला पाठिंबा देत आहेत. युद्धाच्या काळात कोणत्याही एका देशाला तंत्रज्ञान देणे योग्य आहे का? आंदोलकांचे प्रवक्ते जेन चुंग यांनी सांगितले की, दोन्ही कार्यालयातून 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
एका आंदोलकाने व्हिडिओ रेकॉर्ड करून शेअर केला आहे. न्यूयॉर्कमधील गुगलच्या कार्यालयात पोलिस आले आणि त्यांनी आंदोलकांना शांत राहण्यास सांगितले, त्यानंतर त्यांना कार्यालयातून बाहेर पडण्यास सांगितले, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी तसे केल्यास त्यांना ताब्यात घेण्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी पोलिसांचे म्हणणे न ऐकताच त्यांना अटक करण्यात आली.
गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीच्या धोरणाला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, त्यांच्यावर कंपनी कारवाई करणार आहे.