Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) हे तुरूंगात आंबे, मिठाई खात आहेत, असा दावा सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) आज विशेष न्यायालयात करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
शरिरातील साखरेची तपासणी करावी आणि डॉक्टरांना भेटण्याची परवानगी मिळावी, अशा विनंतीची याचिका अरविंद केजरीवाल यांनी दाखल केली आहे. तर या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ईडीने मोठा दावा केला आहे.
शरिरातील साखर वाढली तर जामीन मिळू शकतो, या उद्देशाने अरविंद केजरीवाल तुरूंगात आंबे, मिठाई खात आहेत. तसेच ते चहाचे सेवन देखील करत आहेत, असे ईडीच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे.
ईडीच्या या दाव्यानंतर केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ईडीच्या दाव्याचे खंडन केले आहे. त्यानंतर केजरीवालांना दिल्या जात असलेल्या आहाराची माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने तिहार तुरूंग प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता सदर प्रकरणाची सुनावणी शु्क्रवारी होणार आहे.