जपानमध्ये पुन्हा एकदा जोरदार भूकंप झाला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पश्चिम जपानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात काही घरे कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा आहे. मात्र, त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. USGS ने उवाजिमाच्या पश्चिमेला सुमारे १८ किलोमीटर (11 मैल) भूकंपाचे केंद्र सुमारे २५ किलोमीटर इतके होते. हा भूकंप क्युशू आणि शिकोकू बेटांना वेगळे करणाऱ्या भागात झाला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. जपानच्या होन्शुच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला, असे नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीकडून सांगण्यात आले आहे. सकाळी 8:46 वाजता जपानमध्ये झालेल्या भूकंपाची खोली 55 किमी होती . मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले होते. तैवानला धडकलेल्या ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. काल तैवानमध्ये झालेल्या जवळपास एक चतुर्थांश शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला असून 143 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याचे वृत्त समोर आले होते.