Loksabha Election 2024 : आजपासून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 102 जागांवर आज मतदान झाले आहे. महाराष्ट्रात देखील 5 जागांवर आज मतदान झाले. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे.
आज सर्व राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. पण भाजप आणि मित्रपक्षाची सत्ता असलेल्या नागालँडमधील (Nagaland) सहा जिल्ह्यांमध्ये शुन्य टक्के मतदान झालं आहे. कारण तेथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे निवडणूक मतदान प्रक्रियेचा खोळंबा झाला आहे.
नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांवरती मतदार फिरकलेही नाहीत. त्यामुळे तिथे शून्य टक्के मतदान झाले आहे. तसेच आता शेवटच्या दोन तासांमध्ये काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज नागालँडमधील एका मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पण येथे मतदानावर ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तेथे मतदान करण्यास मतदार फिरकले नाहीत. तसेच केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नसल्यामुळे मतदारांमध्ये निरूत्साह आहे.
दरम्यान, नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यापैकी 20 मतदरासंघांमध्ये मतदारांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे याचा परिणाम सहा जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे.