BJP Office Fire : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की धूर आणि आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आले आहेत.
मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागली आहे. या कार्यालयात वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडली आहे.
ही घटना आज दुपारी 4.35 च्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, भाजपच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.