चिथावणीखोर वक्तव्ये आणि चिथावणी देण्याच्या एका खटल्यात कोणताही पुरावा नसल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद बेंच ने निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने हा खटला रद्द केला आहे. मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये १६ वर्ष जुन्या खटल्यातील दोषमुक्तीच्या अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरु होती.
२१ ऑक्टोबर २००८ मधील हे प्रकरण आहे. ज्यामध्ये धाराशिव तेव्हाचे उस्मानाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर एसटीवर दगडफेक करण्याचा आरोप करण्यात आला होता. २००८ मध्ये बिहार आणि उत्तर प्रकादेशातील उत्तर प्रांतीय नागरिकांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या हिरवल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुंबईत रेल्वेची परीक्षा देणाऱ्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण तसे कार्यकर्त्यांना भडकविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासामध्ये त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. मात्र कोर्टात याची सुनावणी पार पडली. त्यानंतर मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला आहे.