Rajnath Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कधीही धर्माच्या आधारावर किंवा समाजात फूट पाडून राजकारण केले नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सांगितले. तसेच माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग हे 2006 मध्ये मुस्लिम आरक्षणाबाबत बोलले होते, असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला.
राजनाथ सिंह हे गौतम बुद्ध नगर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार महेश शर्मा यांच्या समर्थनार्थ ग्रेटर नोएडा येथे आयोजित निवडणूक रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, “भगिनींनो आणि भावांनो, मी पंतप्रधानांना आज ओळखतो असे नाही. आमच्यात अनेक दिवसांपासून चांगले संबंध आहेत. तसेच मोदींनी कधीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांचे राजकारण केले नाही. समाजात फूट पाडून राजकारण करण्याचा विचार आमच्या पंतप्रधानांनी कधीच केला नाही”, असे राजनाथ सिंहे म्हणाले.
पुढे राजनाथ सिंह यानी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, आम्ही मालमत्तांचे सर्वेक्षण करू. असे जाहीरनाम्यात म्हटले असेल तर त्यावर जनतेचा आक्षेप का असावा. मालमत्तांचे सर्वेक्षण करून तुम्हाला (काँग्रेस) काय करायचे आहे? तुम्हाला देशाच्या संसाधनांचे समान वितरण करायचे आहे का? तुम्हाला नेमकं काय करायचं आहे?” असा सवाल राजनाथ सिंह यांनी विचारला.