लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे आज देशातील आणि राज्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांतील लोकसभेच्या एकूण ८८ जागांवर मतदान होणार आहे. ज्याचा निकाल 4 जून रोजी एकाच वेळी जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुका शांततेत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक नियम केले असून त्याअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बंद करण्यात आला आहे.
याचा अर्थ आता या ८८ जागांवर कोणताही राजकीय पक्ष प्रचार करू शकणार नाही. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपण्याच्या ४८ तास आधी या ८८ जागांवर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रचार आणि प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांमध्ये एकूण ८८ जागांसाठी मतदान होणार आहे. आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, छत्तीसगडमधील ३, जम्मू-काश्मीरमधील १ , कर्नाटकातील १४ , मध्य प्रदेशातील ६, महाराष्ट्रातील ८, राजस्थानमधील १३ , त्रिपुरामधील १, उत्तर प्रदेशातील ८, प. बंगालमधील ३ आणि केरळमधील सर्व २० जागांवर मतदान होणार आहे.