T20 World Cup 2024 : येत्या 1 जूनपासून T20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) सुरू होणार असून याचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला (Team India) 5 जूनला आयर्लंडसोबत पहिला सामना खेळायचा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ लवकरच घोषित केला जाऊ शकतो. कारण, आयसीसीने सर्व संघांना 1 मेपासून संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख दिली आहे.
T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघामझ्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टीम इंडियाच्या संघातून वगळले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे आयपीएल 2024 लक्षात घेता, काही खेळाडूंना संधी मिळू शकते. तसेच टीम इंडियाच्या अनेक माजी खेळाडूंनी त्यांच्या आवडीनुसार टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली आहे.
यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू अंबाती रायडूनेही टी-20 वर्ल्डकपसाठी आपला संघ निवडला आहे. ज्यामध्ये त्याने टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याला वगळले आहे. हार्दिक पांड्याने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी न केल्यामुळे रायुडूने हे केले आहे. त्यामुळे त्याने हार्दिकचा संघात समावेश केलेला नाही.
माजी खेळाडू अंबाती रायडूने IPL 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या 3 खेळाडूंना T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघात संधी दिली आहे. रायुडूने आपल्या 15 सदस्यीय संघात मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संधी दिली आहे.
अंबाती रायुडूने टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. त्यातच आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघातील 3 खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये युवा खेळाडू रियान परागच्या नावाचा समावेश आहे. रियान परागने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय रायुडूने यशस्वी जैस्वाल आणि युझवेंद्र चहल यांनाही संधी दिली आहे.
अंबाती रायुडूने T20 विश्वचषकासाठी निवडलेला 15 सदस्यीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रायन पराग, रिंकू सिंग, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव