Indian Air Force UAV Plane Crashed : नुकताच राजस्थानमध्ये (Rajasthan) मोठा अपघात घडला आहे. भारतीय हवाई दलाचे (IAF) UAV विमान राजस्थानमध्ये कोळल्याची घटना घडली आहे. ही घटना राजस्थानमधील जैलसमेर येथे घडली आहे. तांत्रित बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.
याबाबतची माहिती भारतीय हवाई दलाने ट्विट करत दिली आहे. “भारतीय हवाई दलाच्या एका दूरस्थ पायलट विमानाचा आज जैसलमेरजवळ नियमित प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तसेच अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना करण्यात आली आहे”, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.
भारतीय हवाई दलाचे हे विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला मोठी लागली, त्यामुळे ते जळून राख झाले. या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या अपघाताबाबत पोलीस अधिक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, ते एक टोही विमान असू शकते. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी परमवीर सिंग रावलोत यांनी सांगितलं की, जेव्हा हे विमान कोसळले तेव्हा आम्ही ट्यूबवेलवर बसलो होतो. तर या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.