Loksabha Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा आणि राहुल गांधी अनुक्रमे रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी आज (25 एप्रिल) दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असून पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीचा दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी होणार आहे. या टप्प्यात वायनाड येथून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. तर इराणी यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा या जागेवरून उमेदवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागा करारानुसार, निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या राज्यात काँग्रेस १७ जागांवर आणि समाजवादी पक्ष उर्वरित ६३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. रायबरेली आणि अमेठी या पारंपारिक बालेकिल्ल्यांशिवाय काँग्रेस वाराणसी, गाझियाबाद आणि कानपूरमध्येही निवडणूक लढवत आहे.
तत्पूर्वी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची पोस्टर्स बुधवारी अमेठीच्या गौरीगंज भागात पक्षाच्या कार्यालयाबाहेर दिसली. त्यामुळे वढेरा यांच्या संभाव्य तिकीटाची शक्यता बळावली. यावरून काँग्रेसला प्रत्येक जागेसाठी लढण्याची इच्छा असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे गांधी भावंडांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अमेठी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर प्रचार करत असल्याने राहुल गांधींना त्यांच्या पूर्वीच्या बालेकिल्ल्यात जाणे सोपे जाणार नाही. 8 एप्रिल रोजी स्मृती इराणींनी राहुल गांधी यांच्या अमेठीतील निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
“गांधी परिवार अमेठीतून निवडणूक लढवायला येणार हे भाजप कार्यकर्त्यांना माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातील 19 लाख नागरिकांना रेशन पाठवले, जर गांधी परिवार नरेंद्र मोदींच्या विरोधात असेल, तर हे 19 लाख नागरिकांना मोफत रेशन मिळणार आहे. या कुटुंबांना गांधी परिवार काय म्हणणार?… मी काही दिवसांपूर्वी वायनाडला गेलो होते आणि मला माहिती मिळाली की, राहुल गांधींनी वायनाडला आपले कुटुंब घोषित केले आहे. तर काल एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, राहुल गांधींनी वायनाडची निवड केली कारण राहुल गांधी म्हणतात की वायनाडचे लोक अधिक निष्ठावान आहेत, मग अमेठीच्या निष्ठेचे काय?”, असा सवाल स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत केला.
रायबरेली हा 1960 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी या दोघांनीही त्याचे प्रतिनिधित्व केले होते. 2006 च्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यापासून सोनिया गांधी या मतदारसंघातून खासदार आहेत. सोनिया वरच्या सभागृहात गेल्याने काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.