Maharashtra Loksabha Election 2024 Phase 2 : 21 एप्रिलापासून देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकीला सुरूवात झाली आहे. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान झालं. यामध्ये महाराष्ट्र, आसाम, बिहार, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम, सिक्कीम, राजस्थान, तामिळनाडू, पश्चमि बंगाल, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान-निकोबार बेट, पश्चिम बंगाल, लढद्विप, पुदुच्चेरी आणि जम्मू-काश्मीर या भागांमध्ये मतदान पार पडलं.
आता 26 एप्रिलला म्हणजेच उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती, नांदेड, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि परभणी या मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे.
उद्या महाराष्ट्रात अकोला, बुलढाणा, अमरावती, नांदेड, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि परभणी या आठ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद असणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 5 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान झालं तर आता उद्या म्हणजेच 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 7 मे या दिवशी तिसरा टप्पा, 13 मे या दिवशी चौथा टप्पा आणि 20 मे या दिवशी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.