देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण वर्धा लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
हायुतीने वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना तिकीट दिले आहे. तर महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमर काळे या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघ जातीय ध्रुवीकरणासाठी ओळखला जातो. यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. एकेकाळी वर्धा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र यंदा तिथेच काँग्रेसचा उमेदवार देण्यात आलेला नाहीये.
रामदास तडस हे विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर वर्ध्यात निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण महत्वाचे ठरते. यावेळेस उमेदवारी मिळणार कि नाही या चिंतेत तडस होते. मात्र भाजपच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र रामदास तडस यांच्यावर कुटुंबातूनच झालेल्या आरोपांमुळे त्यांच्यासाठी लढाई सोपी नसणार आहे. जमिनीवरील नेता, अफाट जनसंपर्क असलेले अशी रामदास तडस यांची ओळख आहे. तर अमर काळे यांची मुळे काँग्रेसची असल्यानेच त्यानं उमेदवारी देण्यात राष्ट्रवादीने साथ दिल्याचे दिसत आहे.
भाजपाने वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी भाजपाची संघटना मजबूत आहे. तर अमर काळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन फारसे ताकदवान नसल्याचे पाहायला मिळत आहे. मोदींसाठी महायतिचे उमेदवार निवडून द्या यावर भाजपने प्रचारात जास्त जोर दिल्याचे दिसते आहे. तर इंडिया आघाडी काहीही करून मोदी नकोतच यावर आपला प्रचार करताना दिसून येत आहे. या लढाईत मतांचे विभाजन जातीय पैलूंवर होण्याची शक्यता आहे.
वर्धा लोकसभेत ६ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी ४ भाजपाकडे तर १ काँग्रेस व १ अपक्षाकडे आहे. मात्र सुनेने केलेल्या आरोपांमुळे तडस यांना बचावात्मक पवित्र घ्यावा लागला. त्यामुळे या मुद्द्यावरून विरोधक तडस यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जातीय समीकरणे या ठिकाणी कोणाच्या बाजूने जातात, त्यावर निकाल अवलंबून आहे असे दिदस्त आहे. विद्यमान खासदार रामदास टीडीएस विजयाची हॅट्ट्रिक करणार की? अमर काळे भाजपचा गड जिंकणार हे ४ तारखेला अप्प्ल्याला कळणारच आहे.